बिशप देवप्रसाद: रोझरी चर्च व रोझरी स्कूल ला सदिच्छा भेट

यशस्वी जीवन जगण्यासाठी आज प्रत्येक जण धडपडत आहे, पण स्वतः मधील शिस्त व कठोर मेहनत या दोन गोष्टीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे मत उदयपूर(राजस्थान ) येथील डायोसिझनचे महागुरू रेव्ह. बिशप देवप्रसाद गणवा यांनी व्यक्त केले. आजरा येथील रोझरी चर्च व रोझरी इंग्लिश स्कूलला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी ते बोलत होते.

रोझरी चर्चचे पॅरीश प्रिस्त व रोझरी स्कूल चे प्राचार्य फादर फेलिक्स लोबो यांनी स्वागत केले तर फादर मिनिन वाडकर यांच्या हस्ते महागुरुंचा सत्कार करण्यात आला. यावेळी महागुरू देवप्रसाद म्हणाले ," माणसाने नेहमी गतीशील असायला हवे .बदलाची भूमिका अंगिकारून योग्य दिशेनी वाटचाल केल्यास यश मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


राजस्थान येथील राष्ट्रीय एकात्मकता संस्थेचे संचालक फादर नॉबर्ट हरमन म्हणाले," प्रेम,दया व शांती हि आपणास ईश्वराने दिलेली देणगी आहे. जात पात, धर्म . वंश याबाबी बाजूला सारून आपण भारतीय आहोत हाच खरा धर्म असल्याचे मत त्यांनी मांडले.


या कार्यक्रमाचे औचित साधून गोवा येथील गिल्ड संस्थेच्या वतीने समाजातील व शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी " दातांची निगा " या विषयावर दंतचिकित्सक डॉ. वैध यांनी मार्गदर्शन केले

  • YouTube Social  Icon
  • Facebook
  • Twitter
Bishop's House
Diocese of Sindhudurg,
S. No. 27-5/2, Varde Road,
Oros Budruk, Taluka: Kudal,
District: Sindhudurg - 416812, Maharashtra, India. 

 
Email: sindhudioc@rediffmail.com
Finance section: sindhudioc_finance@rediffmail.com
Office Contact: +91-7507099434

​​​

© 2019 by Diocese of Sindhudurg